नवरा माझा नवसाचा भाग 2 तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचे निर्माते रायटर ,डायरेक्टर सचिन पिळगावकर यांनी लवकरच चित्रपट भेटीस येईल अशी घोषणा केली. चित्रपटाची shooting सुरू असून त्यात नवरा माझा नवसाचा भाग १ मधील कलाकारांसह अजून नवीन कलावंत असणार आहे.
2005 मध्ये आलेला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा चांगलाच गाजला. सचिन पिळगावकर दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. आज इतक्या वर्षानंतरही प्रेक्षक या सिनेमातल्या कोणत्याच पात्राला विसरू शकली नाही.
सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, विजय पाटकर, जॉनी लिवर, मधुराणी, प्रभुलकर, अतुल परचुरे, सुनील तावडे, प्रदीप पटवर्धन, वैभव मांगले, जयवंत वाडकर, अली असगर असे दमदार कलाकार या सिनेमात होते. या सिनेमातील गाणी याचं कथानक चांगलच गाजलं तर आज इतक्या वर्षानंतर नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाची घोषणा झाली आहे.त्याच बरोबर नवरा माझा नवसाचा भाग 2 चित्रपटांमध्ये सचिन पिळगावकर , अशोक सराफ सह अभिनेते स्वप्नील जोशी ,अभिनेती हेमा लिंगले, निवेदिता सराफ , अभिनेता सिद्धार्थ जाधव , संतोष पवार अजून नवीन कलावंत असणार आहे.
नवरा माझा नवसाचा भाग 2 new cast:
अभिनेते जयवंत वाडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या सिनेमाचं शूट सुरु होत असल्याचं जाहीर केलं. नवरा माझा नवसाचा दोन उद्यापासून शूट सुरु होत आहे. तुमचे आशीर्वाद आमच्यावर असूदेत असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय.
तर अनेकांनी या फोटोवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. सचिन पिळगावकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आपल्या कधी भेटीला येणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमात कोणते कलाकार असणार याचं कथानक काय असेल हे लवकरच आपल्याला कळेल.
latest post :
👉🏻👉🏻Revealed the Real Owners of IPL 2024 Teams: आयपीएल २०२४ सर्व टीमचे मालक आणि माहिती 2024👈🏻👈🏻
👉🏻👉🏻2024 Bollywood : 5 Action- packed Films You Can’t Miss! २०२४ मधील ५ Action सिनेमे👈🏻👈🏻
👉🏻👉🏻How to Apply for a Voter Card Online 2024?: Step-by-Step Guide and Successfully Download👈🏻👈🏻